Aarti
युगे अठ्ठावीस (श्री विठ्ठल आरती)
Yuge Atthavis (Shri Vitthal Aarti, Marathi)
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा। चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥
जय देव जय देव जय पांडुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा॥ जय देव जय देव॥
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी। कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी। देव सुरवर नित्य येती भेटी। गरुड हनुमंत पुढे उभे राहती॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा। सुवर्णाचे कमळ वनमाळा गळा। राई रखुमाबाई राणीया सकळा। ओवाळिती राजा विठोबा सावळा॥
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती। चंद्रभागेमाजी सोडुनिया देती। दिंड्या पताका वैष्णव नाचती। पंढरीचा महिमा वर्णावा किती॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती। चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती। दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओवाळिती॥
जय देव जय देव जय पांडुरंगा। रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा॥ जय देव जय देव॥
Sourced · awaiting volunteer check
Help the community: compare this with a printed edition or official source and confirm it, or suggest a fix.
Recited on
More for Krishna